🎓पदवीधर मतदार नोंदणी: लोकशाहीतील तुमचा सक्रिय सहभाग

काय अजुन पदवीधर मतदार नोंदणी करुन लोकशाहीतील तुमचा सक्रिय सहभाग नोंदविला नाही? पदवीधर मतदार  नोंदणी  करुन लोकशाहीतील तुमचा सक्रिय सहभाग होण्यासाठी तयार आहात का? चला मग आता तुमची आली संधी आहे. ऑनलाईन व्दारे आपण नोंदणी करु शकतो. पदवीधर मतदारसंघ (Graduate Constituency) हा विधान परिषदेसाठी (Legislative Council) असतो आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी उच्च शिक्षण घेतलेल्या मतदारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडतात. एक सुशिक्षित नागरिक म्हणून, तुमच्या या मतदानाच्या हक्काचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पदवीधर मतदार नोंदणी -चला मग तुमचा मतदानाचा हक्क ओळखा!

♂️ तुम्ही पात्र आहात का? पात्रता तपासा:

पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी खालील प्रमुख अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही ज्या मतदारसंघासाठी नोंदणी करत आहात, त्या मतदारसंघाच्या क्षेत्रात तुमचा सर्वसाधारण रहिवास असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची जी अंतिम तारीख असेल, त्यापूर्वी किमान तीन वर्षांपूर्वी तुम्ही भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी (Graduate) किंवा पदविका (Diploma) उत्तीर्ण केलेली असावी.
    • उदाहरणार्थ: जर नोंदणीसाठीची अर्हता तारीख (Qualifying Date) १ नोव्हेंबर २०२५ असेल, तर तुमची पदवी / पदविका १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पूर्ण झालेली असावी.

तीन वर्षांचा कालावधी हा तुमच्या अंतिम निकालाच्या घोषणेच्या तारखेपासून मोजला जातो.

Offline नोंदणी प्रक्रिया कशी करावी ? (Form 18)

पहिलाटप्पा – आपला Part आणि Serial Number शोधा  https://electoralsearch.eci.gov.in

या लिंकवर गेल्यानंतर खालीलप्रमाणे Screen Open होतो. आणि  आपला Election Card Number व Captcha Code टाका. तिथे मिळणारा Part Number व Part Serial Number नीट नोंद करून ठेवा.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना १८ (Form 18) वापरावा लागतो.

. अर्ज मिळवा:

  • मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ceoelection.maharashtra.gov.in  नमुना १८ (Form 18) डाउनलोड करा.
  •  
  • किंवा, संबंधित विभागीय आयुक्त (मतदार नोंदणी अधिकारी) किंवा जिल्हाधिकारी (सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी) यांच्या कार्यालयातून मिळवा.

. अर्ज भरा:

  • अर्जातील सर्व माहिती अचूक भरा. (उदा. संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण तपशील, विद्यापीठाचे नाव आणि उत्तीर्ण होण्याची तारीख).
  • तुम्ही कोणत्या वर्षात आणि कोणत्या विद्यापीठातून पदवी / पदविका उत्तीर्ण केली, याचा उल्लेख करा.
  • तुम्ही इतर कोणत्याही पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेली नाही, याची घोषणा करा (किंवा जुनी नोंदणी रद्द करण्याची विनंती करा).

. आवश्यक कागदपत्रे:

नमुना १८ सोबत खालीलपैकी कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे:

  • मूळ पदवी / पदविका प्रमाणपत्र (Original Degree/Diploma Certificate) किंवा
  • स्वयंसाक्षांकित (Self-Attested) प्रत जी खालीलपैकी कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने (Gazetted Officer) प्रमाणित (Attested) केलेली असेल:
    • तहसीलदार
    • शासकीय पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य
    • संबंधित जिल्ह्याचे सर्व राजपत्रित अधिकारी
    • नोटरी पब्लिक (Notary Public)

. अर्ज सादर करा:

  • भरलेला नमुना १८ अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (विभागीय आयुक्त) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (जिल्हाधिकारी/उप-विभागीय अधिकारी/तहसीलदार) यांच्या कार्यालयात जमा करा.
  • टीप: ही नोंदणी प्रक्रिया साधारणपणे निवडणुकीपूर्वी नव्याने केली जाते, त्यामुळे जुन्या मतदारांना देखील पुन्हा अर्ज करणे आवश्यक असते.

Online नोंदणी प्रक्रिया कशी करावी? (Form 18)

Online नोंदणी करण्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Login

👉 येथे आपला मोबाईल क्रमांक आणि Captcha Code टाकून नोंदणी (Registration) करा.

📩 मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा आणि पुढील पृष्ठावर जा.

🖊️ त्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक भरा —

* जिल्हा, विधानसभा

* Part Number, Serial Number

*Drop Down मधून आपली Graduates Constituency निवडा

* आपले पूर्ण नाव, वडिलांचे नाव, पत्ता, विद्यापीठाचे नाव इत्यादी माहिती अचूक भरा.

पदवीधर मतदार नोंदणी - आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

📌 छायाचित्र (JPG, 100KB पर्यंत)

📌 स्वाक्षरी (JPG, 100KB पर्यंत)

📌 डिग्री / डिप्लोमा प्रमाणपत्र (PDF, 200KB पर्यंत)

📌 पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, PDF, 200KB पर्यंत)

💡 जर कोणत्याही फाइलचा आकार जास्त असेल, तर इंटरनेटवर उपलब्ध “compress file” टूलचा वापर करून ती सहज लहान करा.

🗓️ तुमची पदवी वर्ष 2022 किंवा त्याआधीची असणे आवश्यक आहे.

✍️ संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा Application Number नोंदवून ठेवा.

  •  

पदवीधर मतदार नोंदणी साठी या तारखा महत्वाच्या ठेवा

  1. पदवीधर मतदार नोंदणी करीता प्रारुप मतदार यादयाचा प्रसिध्द दिनांक 03/12/2025
  2. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम,1960 चे कलम 12 अंतर्गत) – 03/12/2025 ते 18/12/2025
  3. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्याचा दिनांक 05/01/2026
  4. पदवीधर मतदार यादीची अतिंम प्रसिध्दी दिनांक 12.01.2026

 लक्षात ठेवा:

  • खोटी माहिती देणे कायद्यानुसार शिक्षेस पात्र ठरते.
  • या मतदारसंघामुळे तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणामुळे मिळालेल्या मतदानाचा विशेष अधिकार मिळतो.

तुमची नोंदणी करा आणि विधान परिषदेसाठी योग्य प्रतिनिधी निवडण्यात आपला महत्त्वपूर्ण वाटा उचला

 

आपण जर यापुर्वी नोंद केली असेल तर आपले नाव https://ceoelection.maharashtra.gov.in/ConstituencyRolls/TandGElectoralRollsSimple.aspx या Link Click करुन शोधू शकता. जर काही दुरूस्ती असेल तर तहसिल कार्यालय,येथे Form 8 भरुन दूरूस्ती करू शकता.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Share via
Copy link