📖 1 – परिचय
BLO App म्हणजे काय?
BLO (Booth Level Officer) हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा आहे.
त्याचं मुख्य काम म्हणजे मतदार यादी अद्ययावत ठेवणं आणि नव्या मतदारांची नोंदणी करणे.
ही जबाबदारी सोप्या आणि डिजिटल पद्धतीने पार पाडण्यासाठी BLO App वापरला जातो. BLO App Download करण्यासाठी पुढील Link वर Click करा. https://play.google.com/store/search?q=blo+app&c=apps

असा Image असलेला BLO App Downlod करा.
उद्दिष्ट:
- मतदार नोंदणी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करणे
- डिजिटल स्वरूपात नोंदी ठेवणे
- फॉर्म 6, 7, 8 आणि 8A यांची सोपी हाताळणी करणे
🗳️ 2 – फॉर्म क्रमांक ६ म्हणजे काय?
फॉर्म क्रमांक ६ (Form No. 6)
हा फॉर्म नवीन मतदार नोंदणीसाठी वापरला जातो.
१८ वर्षांवरील नागरिक जे प्रथमच मतदानासाठी पात्र ठरतात, त्यांनी हा फॉर्म भरावा.
उद्देश:
- नवीन मतदाराचं नाव मतदार यादीत समाविष्ट करणे
- स्थलांतरित व्यक्तीचं नवीन पत्त्यावर नोंदणी करणे
महत्त्वाची अट:
- वय किमान १८ वर्षं पूर्ण असणे
- अर्जदार त्या क्षेत्रात कायमस्वरूपी किंवा सहा महिने राहणारा असणे
📲 3 – लॉगिन प्रक्रिया
1️⃣ BLO App मोबाईलमध्ये उघडा
2️⃣ आपला User ID आणि Password टाका
3️⃣ लॉगिन झाल्यानंतर “Forms” पर्यायावर क्लिक करा
4️⃣ “Form 6 – New Voter Registration” निवडा
टीप:
- इंटरनेट कनेक्शन सुरू असावे
- App ची अद्ययावत आवृत्ती (latest version) वापरा
✍️ 4 – फॉर्म भरण्याच्या पायऱ्या
सुरवातीला त्याचा योग्य तो यादी भाग क्र निवडा व तो राहत असलेल्या यादी भागाचा पत्ता निवडा. सोबत त्याच्या घरातील एखादया नातेवाईकाचा मतदान कार्ड असू दया जेणे करुन त्याचे नाव त्याच्या नातेवाईकासोबत जवळच जोडल्या जाईल.
Step 1: अर्जदाराचे नाव ( इंग्रजी भाषेत लिहल्यानंतर मराठीत आपोआप येते ते चेक करावे ) लिहा.अर्जदाराचे नाव टाकतांना सुरूवातीचे नाव टाकुन मधले नाव टाकावे (First Name Followed By Middal Name) व Surname मध्ये आडनाव टाकावे.(जर पहिल्या कॉलम मध्ये संपुर्ण नाव टाकले व Surname मध्ये परत आडनाव टाकले तर नंतर आडनाव डबल येते.)
Step 2: लिंग निवडा (पुरुष / स्त्री / इतर)
Step 3: जन्मतारीख व वय टाका (सध्या 1.10.2006 वय असलेले मतदारांची नोंदणी होत आहे.)
Step 4: वडिलांचे/आईचे नाव व पूर्ण पत्ता भरा
Step 5: विधानसभा क्षेत्र (Constituency) निवडा
Step 6: मोबाइल क्रमांक आणि ईमेल (असल्यास) जोडा
📎 5 – पुरावे अपलोड करणे
आवश्यक कागदपत्रे:
- वयाचा पुरावा पुढील पैकी कोणताही एक (आधार कार्ड / पारपत्र / वाहन परवाना/ जन्म प्रमाणपत्र / 10 व 12 वी सनद)
- पत्त्याचा पुरावा पैकी कोणताही एक (आधार कार्ड / वीज बिल / भाडेकरार (कमीत कमी 1 वर्षे अगोदरचे) / राशन कार्ड / 7/12 वर नोंद)
अपलोड पद्धत:
- कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा
- स्पष्ट फोटो घ्या किंवा गॅलरीतून निवडा
- “Upload” बटणावर क्लिक करून जतन करा
टीप:
फोटो अस्पष्ट असल्यास अर्ज अपूर्ण राहू शकतो.
📸 6 – अर्जदाराचा फोटो अपलोड करणे
1️⃣ अर्जदाराचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो घ्या
2️⃣ “Add Photo” वर क्लिक करा
3️⃣ फोटो योग्यरित्या संपुर्ण बॉर्डर दिसत आहे याची खात्री करा
4️⃣ “Save” करा आणि पुढील टप्प्यावर जा
✅ 7 – फॉर्म तपासणी आणि सबमिट
- सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा
- चुका असल्यास “Edit” करून सुधारणा करा
- सर्व योग्य असल्यास “Submit” वर क्लिक करा
- सबमिट झाल्यावर Application Reference ID मिळेल
ही ID अर्जदाराला नोंदवून द्या — त्याद्वारे तो आपली अर्ज स्थिती पाहू शकतो.
🔍 8 – पडताळणी प्रक्रिया
- BLO स्वतः अर्जदाराच्या पत्त्यावर भेट देतो
- कागदपत्रे तपासतो आणि अर्ज मंजूर करतो
- मंजूरीनंतर नाव मतदार यादीत समाविष्ट होते
महत्त्वाची सूचना:
आपल्या चेकलिस्ट मध्ये आलेले फॉर्म वेळोवेळी निकाली काढावेत. BLO ने पडताळणी अहवाल वेळेत पाठवणे अत्यावश्यक आहे.
💡 9 – BLO साठी खास सूचना
- फॉर्म भरताना अचूक माहिती लिहा
- अर्जदाराचे फोटो आणि पुरावे स्पष्ट ठेवा
- नेटवर्क उपलब्ध नसल्यास, डेटा “Offline” सेव्ह करा
- App Sync झाल्यावर सर्व डेटा सर्व्हरवर अपलोड होतो
सामान्य चुका टाळा:
❌ चुकीची जन्मतारीख
❌ अस्पष्ट फोटो
❌ चुकीचा पत्ता किंवा अपूर्ण कागदपत्रं
📘 निष्कर्ष
“Form No. 6” हा BLO च्या कामातील सर्वात महत्त्वाचा फॉर्म आहे.
तो नीट, वेळेत आणि अचूक भरल्यास मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी बनते.
“एक जबाबदार BLO म्हणजे लोकशाहीचा खरा रक्षक
Voter Help Line वर ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी पुढील Link वर Click करा.
https://vktworld.in/https-vktworld-in-kay-matdar-yadit-naav-nondvine/
Khandaretanaya24@gmail.com
Ok
मु रेडवा पो. काजळेश्वर ता. बार्शी टाकळी जि.अकोला
अंगणवाडी सेविका रेडवा
durgadeshmukh379@gmail.com
Ambadgaon -152
Pingback: BLO App - Form 8 bharnyachi prakriya- correction form