होय,मतदार यादीत नाव नोंदविणे (Voter Ragistration) सोपे झाले आहे.कसे? जर आपण 18 वर्षाचे झाले असाल तर आपण घर बसल्या नाव नोंदणी सहज करू शकतो.त्या साठी फक्त आपणास खालील काही टप्पे पार करून आपली नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क आपण बजावू शकतो.तर चला मग कसे आपली नोंदणी करता येईल ते जाणून घेऊ.
1.मतदार यादीत नाव कसे व कुठे नोंदणी करता येईल मला.
मा.भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) यांच्या Play Store मधून Voter helpline app हे ॲप Download करावे. हे ॲप भारतीय मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे, नवीन नोंदणीसाठी अर्ज करणे (फॉर्म-6), दुरुस्त्या करणे (फॉर्म-8) आणि इतर सेवा पुरवते. voters.eci.gov.in या संकेत स्थळावर जाऊन वरील दिलेल्या Screen दिसेल.
1.मतदार नोंदणी करीता कशी करावी.
सुरूवातीला स्वत:चा मोबाईल क्रमांक व्दारे नोंदणी (Ragistration) OTP व्दारे पुर्ण करा. त्यावर आपले अकाऊंट तयार करुन आपली नोंदणी पुर्ण करावी . त्यानंतर Log In करावी. आपली नविन नाव नमुना न 6 मध्ये Voter Ragistration पध्दत (Process ) पुर्ण करावी. या पोर्टलवर तुम्ही नवीन मतदारांसाठी नोंदणी अर्ज (फॉर्म-6) भरू शकता,
मतदार यादीतील नोंदींमध्ये बदल किंवा दुरुस्ती, एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी अर्ज नमुना न 8 करू शकता, तसेच जर मयत, दुबार नावे वगळायचे असेल तर नमुना न 7 सुध्दा भरु शकता. तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.किंवा आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क करू शकता.
2.मला नाव नोंदणी साठी कोणती कागद पत्रे द्यावी लागतील.
नाव नोंदविणे करीता आवश्यक कागदपत्रे नमुना न 6 फॉर्म सह खालील प्रमाणे कागदपत्रे (Document)
A. आपणास जन्माचा किंवा वयाच्या पुरावाच्या करीता (कोणताही एक पुरावा) – टी.सी., 10 व 12 वी ची सनद, आधार कार्ड,पारपत्र, निर्गम उतारा, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना
B. रहिवास किंवा वास्तव्याचा पुरावा (कोणताही एक पुरावा) – लाईट बील,पाणी पट्टी,घरपट्टी,घरभाडे करार (किरायादारासाठी फक्त),आधार कार्ड, बँक पासबुक, महसुली दस्तावेज, व इतर जो की रहिवास म्हणून दाखविता येईल.
3. नोंदणी केली हे कसे कळेल व मतदान कार्ड केव्हा व कसे मिळेल?
Voter Help Line App वर व voter service helpline या ॲपवर नमुना नं 6 मध्ये परीपुर्ण माहिती झाल्यानंतर किंवा मतदान अधिकारी (BLO) यांचे मार्फत नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आपल्या मोबाईल वर एक ECI व्दारे एक संदेश (Massage) येतो. त्यामध्ये Reference ID येतो. तो आपण पुढील संदर्भासाठी सांभाळुन ठेवावा. त्याव्दारे आपण आपल्या भरलेल्या फॉर्मची सदयस्थिती Track Application Status वर तपासता येते. आपले कार्ड तयार झाले की नाही हे पाहू शकतो.कार्ड जर तयार झाले तर आपण online download करता येईल व आपले कार्ड पोस्टाने सुद्धा घरपोच आपण दिलेल्या पत्यावर प्राप्त होईल.पोस्टाव्दारे मतदान कार्ड प्राप्त होईपर्यत आपण ऑनलाईन संकेतस्थावरुन डाऊनलोड करु शकतो.
4.मला ऑनलाईन बद्दल काही माहिती नसल्यास काय करावे?
आपणास जर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा किंवा कोठे भरावा हे माहिती नसेल तर आपल्या जवळच्या मतदान केंद्र येथे जाऊन मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांचेशी संपर्क करावा किंवा आपल्या तहसील कार्यालय येथे निवडणूक विभागात मतदार मदत केंद्रास (Voter Help Center) भेट द्यावी.
5.मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले नाव नोंदवू शकता.
2.https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
टीप: महाराष्ट्र राज्यासाठी, तुम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वेबसाइटलाही भेट देऊ शकता: https://ceoelection.maharashtra.gov.in/
आणखी पोस्ट साठी भेट दया. vktworld.in ला
अत्यंत महत्वाची माहिती हे पण लक्षात ठेवा
- राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
या दिवसाचे महत्त्व
हा दिवस भारताच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India – ECI) स्थापना दिवस (25 जानेवारी 1950) म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस देशातील सर्व मतदारांना समर्पित आहे.
याचा मुख्य उद्देश मतदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांना, विशेषतः नवीन पात्र तरुण मतदारांना, निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे आहे.
हा दिवस पहिल्यांदा 2011 मध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी, 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत जोडली जातात आणि त्यांना त्यांचे मतदार ओळखपत्र (EPIC) दिले जाते.
टीप: महाराष्ट्र राज्यासाठी, तुम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वेबसाइटलाही भेट देऊ शकता: https://ceoelection.maharashtra.gov.in/
आणखी पोस्ट साठी भेट दया. vktworld.in ला
तुम्हाला लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
Share via:
Pingback: BLO प्रशिक्षण मार्गदर्शक – फॉर्म क्रमांक ६ For BLO App