BLO App मध्ये DSE (Demographically Similar Entries) क्लियर करणे म्हणजे एकाच नावाचे, फोटोचे किंवा सारखी माहिती असलेले दोन किंवा अधिक मतदार शोधून त्यातील चुका दुरुस्त करणे होय.
DSE लिस्ट क्लियर करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत खालीलप्रमाणे आहे:
DSE हया तील प्रकारच्या असतात
Witin AC Witin Part (एकाच विधानसभेत एकाच यादी भागामध्ये)
Witin AC Acros Part (एकाच विधानसभेत वेगळया यादी भागामध्ये)
Acrose State (इतर विधानसभा मध्ये)
१. DSE लिस्ट उघडा
- तिथे तुम्हाला तुमच्या भागातील (Part Number) ‘Demographically Similar Entries’ ची यादी दिलेली असेल.
- BLO App मध्ये लॉगिन केल्यानंतर मुख्य स्क्रीनवर (Dashboard) तुम्हाला DSE नावाचा टॅब किंवा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

२. DSE Tab ओपन केल्यानंतर करावयाची कार्यवाही


- DSE Indetify मध्ये वर दिलेल्या प्रमाणे (DSE Within Part, DSE Across Part आणि DSE Across AC ) अशा तीनही प्रकारच्या List आपण पाहु शकतो.
- Cluster Id वर Click केल्यानंतर सुरूवातील आपणास पिवळया रंगामध्ये मतदाराचे नाव, वय, लिंग याची माहिती आपणास पाहता येते.
- त्याच्या खाली आकाशी रंगामध्ये आपल्या यादीभागामध्ये असलेल्या मतदाराची संपुर्ण माहिती (EPIC,Address,Part No and Sl No And Photo) आपणास पाहता येते.
- DSE Within Part व्यतिरिक्त पांढऱ्या रंगामध्ये इतर यादी भागातील मतदाराची माहिती आपणास पाहता येते.
- महत्वाचे DSE Identified मध्ये आपण फक्त मतदाराविषयी माहिती पाहु शकतो. यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करता येत नाही.
- B. Checklist Submission बाबत करावयाची कार्यवाही
- Checklist Submission या Tab वर Click केल्यानंतर आपणास सर्व Pending DSE दिसतात.
- यामध्ये Cluster ID हा महत्वाचा क्रमांक आहे. मतदारांच्या नावावर Click केल्यानंतर आपणास तीन रंगामध्ये मतदाराची माहिती दिसते.
- पिवळया (Yellow) रंगामध्ये मतदाराची माहिती दिसेल.
- आकाशी (Navy Blue) रंगामध्ये स्वत:च्या यादीभागातील मतदाराची माहिती दिसेल. यावर आपणास कार्यवाही करावयाची आहे.
- मतदाराची पडताळणी करीत असतांना जर मतदाराला Format A प्राप्त झाली असेल ती अपलोड करावी किंवा तेथील रहीवास असल्याचा दाखला अपलोड करावा व योग्य तो Remark टाकावा
- पांढऱ्या रंगातील मतदारावर Click केल्यांनतर आपणास Action मध्ये No Information यावर Click करुन Remark मध्ये No Information असा Remark टाकुन Submit या बटन वर Click करा. कारण तो आपल्या यादीभागामधील मतदार नसल्यामुळे त्याबाबत आपण कोणतीही माहिती देवू शकत नाही.
- महत्वाचे जेव्हा एका Cluster ID मधील सर्व मतदाराचे Submission केल्याशिवाय DSE पुर्ण होणार नाही.
- Checklist Submission केल्यानंतर एका Cluster ID मधील सर्व मतदाराची पडताळणी झाल्यावर Pending मधून निघून जाते व Completed मध्ये जाते व जश्या आपण मतदाराची पळताळणी होणार तशी Pending मधील मतदाराची संख्या कमी होवून Completed मध्ये दिसेल.
३. प्रत्यक्ष पडताळणी (Field Visit)
- ॲपमध्ये निर्णय घेण्यापूर्वी त्या मतदाराच्या घरी जाऊन खात्री करा की:
- हे दोन वेगळे लोक आहेत का?
- की एकाच व्यक्तीचे नाव दोनदा आले आहे?
- की व्यक्ती एकच आहे पण पत्ता बदलला आहे?
४. योग्य पर्याय निवडा (Decision Making)
पडताळणीनंतर तुम्हाला खालीलपैकी एक पर्याय निवडावा लागेल:
| परिस्थिती | काय निवडावे? | Solution |
|---|---|---|
| जर दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतील | ज्या मतदाराची माहिती बरोबर असेल त्या मतदाराचे Verification पुर्ण करावे. Original हा पर्याय निवडा.आपणास योग्य तो Remark टाकुन Submit करा. | ज्या मतदाराची माहिती बरोबर नसेल त्यासाठी फॉर्म नं 8 भरुन मतदाराची माहिती बरोबर भरुन Submit करावी. |
| जर एकच व्यक्ती दोनदा असेल (अशी परिस्थिती फक्त आपल्या यादी भागात डबल नाव आले असेल तरच येईल) | ज्या मतदाराची माहिती बरोबर असेल त्या मतदाराचे Verification पुर्ण करावे. Original हा पर्याय निवडा.आपणास योग्य तो Remark टाकुन Submit करा. | जो रेकॉर्ड चुकीचा आहे तिथे Duplicate किंवा Absent/Shifted/Dead (ASD) निवडा. योग्य तो Remark टाकुन Submit करा. |
| इतर मतदारसंघातील मतदाराबाबत | No information Remark टाकुन Submit करा. |
५. शेरा (Remark) आणि सबमिट
- सर्व माहिती भरल्यावर Remark या रकान्यात तुमचे मत लिहा (उदा. “Found unique after field visit” किंवा “No Information”).
- त्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
महत्त्वाच्या गोष्टी:
- फोटो नीट तपासा: अनेकदा नाव सारखे असते पण फोटो वेगळे असतात, अशा वेळी ते ‘Unique’ असतात.
- सावधगिरी: चुकूनही जिवंत किंवा मूळ मतदाराचे नाव ‘Duplicate’ म्हणून मार्क करू नका, अन्यथा त्यांचे नाव मतदार यादीतून कट होऊ शकते.
- Voter बाबत माहिती साठी:https://electoralsearch.eci.gov.in/ वर Click करा.
- FORM No 6 यासाठी https://vktworld.in/blo-prashikshan-margdarshan-form-number-6-for-blo/ या वर CLICK करा.
Good information for all BLO.